close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जागा युती जिंकणार - चंद्रकांत पाटील

केंद्रात भाजपला मोठे यश मिळणार. कोऱ्या कागदावर लिहून ठेवा - पाटील

Updated: May 18, 2019, 03:53 PM IST
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जागा युती जिंकणार - चंद्रकांत पाटील
संग्रहित छाया

जळगाव  : केंद्रात भाजपला २९० तर राज्यात युतीच्या ४४ जागा येतील असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकवणार आहे, असा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात येणार, चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले आहे. त्यामुळे २३ तारखेच्या निकालकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावालयलाही तयार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. 

पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा युती पटकवणार आहे. त्यात पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश असेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.