धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्ता जप्तीचे आदेश

धनंजय मुंडेंना मोठा दणका

Updated: Sep 13, 2018, 02:21 PM IST
धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, मालमत्ता जप्तीचे आदेश

बीड : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. जगमित्र नागा सूतगिरणी प्रकरणी तारण असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संचालक मंडळातील सर्वांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.

3 कोटींच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांचं घर, सूतगिरणीचं कार्यालय आणि इतर मालमत्ताचा यापुढे व्यवहार करता येणार नाही असे आदेश न्यायलयाने दिले आहेत. या गैरव्यवहार प्रकरणी धनंजय मुंडे यांचं देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर येथील शेती आणि अंबाजोगाई रोडवरील घर आणि जगमित्र सूतगिरणीच्या ऑफिसच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

पाहा व्हिडिओ