Amravati violence : अमरावती हिंसाचार प्रकरणी आणखी एका भाजप नेत्याला अटक

Amravati violence case : बंद दरम्यान हिंसाचार झाल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.  

Updated: Nov 17, 2021, 12:58 PM IST
Amravati violence : अमरावती हिंसाचार प्रकरणी आणखी एका भाजप नेत्याला अटक title=

अमरावती : Amravati violence case : बंद दरम्यान हिंसाचार झाल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. शहरात अजून दोन दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज पुन्हा पोलिसांनी अटक सत्र सुरु केले आहे. अमरावती हिंसाचारप्रकरणी माजी राज्यमंत्री भाजप आमदार प्रवीण पोटे (Pravin Pote) यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण पोटे बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. (Another BJP MLA arrested in Amravati violence case )

भाजप नेते पोटे यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत भाजपच्या 24 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 14 जणांना जामीन मंजुर झाला आहे. तर 125 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह 14 नेत्यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, नाशिकमधील मालेगावमध्ये शुक्रवारी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड सुरूच ठेवली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 45 वर पोहचली आहे. मात्र बंदच्या आयोजकांना जेरबंद करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सोमय्या यांचा दौरा रद्द

अमरावती हिंसाचारानंतर 19 नोव्हेंबरपर्यंत शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर जाणार होते. मात्र पोलीस आयुक्तांनी किरीट सोमय्यांना अमरावतीत न येण्याची विनंती केली होती. अखेर किरीट सोमय्यांनी अमरावती दौरा कर्फ्यू संपेपर्यंत पुढे ढकलल्याचं जाहीर केले. 

अमरावतीत अजून दोन दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.19 नोव्हेंबरपर्यंत कर्फ्यूही राहणार आहे. यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत उघडणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.