सोलापूर : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) मंगळवारी सोलापूर येथे पोहोचले. यादरम्यान ते चुकून नंबर प्लेट नसलेल्या कारमध्ये आले. यानंतर स्थानिक पोलिसांनी नियमानुसार कारवाई करत असदुद्दीन ओवेसी यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्याकडून रितसर चलन फाडले.
असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते नंबर प्लेट नसलेल्या वाहनात दिसत आहेत. मात्र, यावेळी ओवेसी मास्क घालायला विसरले नाहीत आणि कारमधून उतरण्यापूर्वी मास्क घातला होता. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला मास्क घालण्याचा सल्ला दिला जात आहे.
राज्यात या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला महानगरपालिका निवडणुका (Civic Election)होणार आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवण्याचा विचार करत आहेत. असदुद्दीन ओवेसी निवडणुकीची तयारी करत आहेत. गेल्या महिन्यात औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यात ओवेसी यांनी पक्ष उमेदवार निवडीबाबत चर्चा करत आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
ओवैसी बिना नंबर प्लेट वाली गाड़ी में सोलापुर पहुंचे। लोकल पुलिस ने ₹200 का चालान काटा।#AIMIM | #AsaduddinOwaisi | @RakeshKTrivedi
अन्य Videos यहां देखें - https://t.co/ZoADfwSi4S pic.twitter.com/viB9JJoxYV
— Zee News (@ZeeNews) November 23, 2021
असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना कोरोना महामारीमुळे मुंबईत रॅलीची परवानगी मिळालेली नाही. ओवेसी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे एका सभेला संबोधित करणार होते, तरीही त्यांना प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही.