अंबरनाथ : जागावाटपाचा कार्यक्रम अद्याप झाला नसला तरी राज्यभरात शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या परीनं दबावयंत्र अवलंबायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या मागणीवरून शिवसेना भाजपात ठिकठिकाणी कलगीतुरा रंगला आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची भाजपनं मागणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे. अंबरनाथ विधानसभा १९९० पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र यंदा भाजपची ताकद या मतदारसंघात वाढली असल्याचं सांगत हा मतदारसंघ आम्हाला द्यावा, अशी भाजपची मागणी आहे.
नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत तसा ठराव पारित करून भाजपनं प्रदेशाध्यक्षांकडे तशी मागणी केली आहे. मात्र यावरून शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे. या भागात शिवसेनेचे खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष आहेत. शिवाय शहरात सर्वाधिक नगरसेवकही शिवसेनेचेच आहेत. त्यामुळं अंबरनाथमध्ये आपली ताकद किती आहे? ते भाजपनं आधी पाहावं, नंतर असल्या मागण्या कराव्यात, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी लगावला आहे.
पुणे जिल्ह्यातल्या भोसरी मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकल्यानं वादाची पहिली ठिणगी पडली आहे. शिवसेना-भाजपा युती झालीच, तर विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडेच राहतील, असा सर्वसाधारण फॉर्म्युला ठरू शकतो. मात्र भोसरीमध्ये शिवसेनेला हे मान्य नाही. इथून २०१४मध्ये महेश लांडगे निवडून आले असताना शिवसेनेनं या जागेवर दावा सांगितलाय. माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव अढळराव पाटील यांनी भाजपावर टीका करत या जागेची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत चिंचवडची जागा भाजपकडे, पिंपरीची शिवसेनेकडे आणि भोसरीची भाजपाकडे असायला हवी. मात्र आढळरावांनी या जागेवर दावा करत अप्रत्यक्षपणे लांडगेंना अडचणीत आणलंय. अर्थात लांडगे हे मुळचे भाजपा नेते नाहीत.