मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे अजित पवारांनी आपला राजीनामा सोपवला आहे. मात्र अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला? याचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्विग्न होऊन अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही यावर आपली भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार यांना अजित पवारांच्या राजीनाम्याविषयी माहिती नव्हती. पार्थ यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्यासाठी हा भावनिक आणि कठीण दिवस राहीला. माझे आणि वडीलांमध्ये झालेले संभाषण कुटुंबप्रमुख शरद पवार यांना मी कळविले आहे. असे ट्विट पार्थ यांनी केले.
It’s been an emotional and difficult day for me ...as a head of our family I have conveyed my father’s conversation with me to @PawarSpeaks
— Parth Pawar (@parthajitpawar) September 27, 2019
अजित पवार यांनी एका ओळीत राजीनामा दिला. आपण आमदारकीचा राजीनामा देत आहोत, आणि त्याचा स्वीकार करावा, अशा एका ओळीत अजित पवारांनी हा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. मात्र, मी कुटुंब प्रमुख असल्याने मला याबाबतची माहिती जाणून घेण्याची माझी जबाबदारी होती. मीही माहीती घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबातही चर्चा केली. तसेच माझे (काका) नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात आल्याने ते अस्वस्थ होते. अस्वस्थता आणि उद्विग्नेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असवा, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, मला राजीनाम्याची बातमी मला पुण्याला येताना समजली. मलाही यासंदर्भातली काहीही कल्पना नव्हती. मी त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यावेळी माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने अजित पवार अस्वस्थ झाले आहेत, असे मला समजले. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना ते सहन झाले नाही. त्याच अस्वस्थेतून त्यांनी राजीनामा दिला असावा. अजित पवार यांच्याशी मी याबाबत चर्चा करेन, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.