ठाणे : कळवा मुंब्रा मतदारसंघातून शिवसेनेने अभिनेत्रीला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघातून शिवसेना दीपाली सय्यदना उमेदवारी देणार आहे. दीपाली सय्यद या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान कळवा मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
रॅलीनंतर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते. शरद पवार उन्हातान्हात रॅलीत सहभागी झाल्याचा क्षण मोठा असल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. पवारांना त्रास दिलेल्यांना धडा शिकवणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाड यांचा अर्ज भरण्यासाठी कन्हैय्या कुमारही आला होता, पण काँग्रसचे स्थानिक नेते या रॅलीसाठी फिरकले नसल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली आहे.