पुण्यात 'गावरान' खाद्य महोत्सव

पुण्यातल्या सिंहगड रस्त्याजवळच्या वडगाव बुद्रुक इथेही सध्या असाच एक खाद्य महोत्सव सुरु आहे.

Updated: Dec 3, 2017, 10:55 AM IST
पुण्यात 'गावरान' खाद्य महोत्सव  title=

पुणे : थंडीची चाहूल लागली की पुणेकरांना वेध लागतात ते महोत्सवांचे. मग ते संगीत महोत्सव असू देत किंवा खाद्य महोत्सव.

पुण्यातल्या सिंहगड रस्त्याजवळच्या वडगाव बुद्रुक इथेही सध्या असाच एक खाद्य महोत्सव सुरु आहे.

३ दिवस 

१ ते  ३ डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवामध्ये पुणे, खडकवासला, खेड, इंदापूरमधल्या जवळपास ३९ महिला बचतगटांनी सहभाग घेतलाय.