औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपातर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली. युतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज दोन्ही उमेदवारांनी महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज भरले.
29 ऑक्टोबरला भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे.
सेनेची महापौर पदाची दावेदारी असताना भाजपाने आपला महापौर बसवण्याची तयारी केली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्याने शिवसेनेचा महापौर पदाच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी देण्यात आली मात्र उपमहापौर पदासाठी भाजपात चांगलीच रस्सीखेच झाली अखेर पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी विजय औताडे यांचे नाव जाहीर केलं उर्वरित अडीच वर्षेही युती शहराचा विकास करेल असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.