रत्नागिरीत वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस फक्त १८ दिवसात

मान्सूनच्या सुरुवातीलाच कोकणात पाऊस मुसळधार कोसळत आहे.

Updated: Jun 18, 2020, 11:41 PM IST
रत्नागिरीत वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस फक्त १८ दिवसात title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मान्सूनच्या सुरुवातीलाच कोकणात पाऊस मुसळधार कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर एकूण वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस अवघ्या १८ दिवसात पडला आहे. गेल्या २४ तासात रत्नागिरीमध्ये सरासरी ११२.७८  मिमी तर एकूण १०१५  मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात १९० मिमी झाली आहे.   रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ३३५५ मि.मी. आहे.

मागच्या २४ तासात मंडणगड ७४ मिमी, दापोली १३०, खेड ७० मिमी, गुहागर ८८ मिमी, चिपळूण ७३ मिमी, संगमेश्वर १०५, रत्नागिरी १३९, लांजा १४६ मिमी, राजापूर १९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दापोली तालुक्यात मंडणगड दापोली येथे पिसई गावाजवळ झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.