Bacchu Kadu On CM Eknath Shinde : अजित पवार गट शिंदे फडवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाले आहेत. यामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. शिंदे गटासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू मंत्रीपदाबाबतची आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. आता मंत्रिपद नकोच अशी भूमिका देखील बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे. बच्चू कडू सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच त्यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना थोडी दाडी आहे म्हणून मी त्यांच्या सोबत आहे असं बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप अखेर झाल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले आहेत. अजित पवारांकडे अर्थखातं दिलं जाऊ नये असं प्रत्येकाचं मत आहे असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मांडली होती. शिंदेगटाचे मित्रपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडूंनी थेट नाराजी बोलून दाखवली होती.
विस्तार झाला तरी आपल्याला मंत्रिपद नकोच अशी भूमिका अपक्ष आमदार बच्चू कडूंनी जाहीर केली आहे. नाराज नाही मात्र 18 जुलैला निर्णय जाहीर करणार असा सूचक इशारा कडूंनी दिला आहे. मंत्रिपद आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही, 15 वर्ष आपण आमदार होतो तोच काळ सुवर्णकाळ होता असं म्हणत आमदार बच्चू कडूंनी आपल्या मनातली खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली.
मी खुश आहे, मला मंत्रालय भेटले आहे. मागचा काळ पाहिला तर अजित दादांना अर्थखाते देवू नये असाच होता, पण आता मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे कोणती चिंता नाही. काँग्रेस वाले किव्हा शरद पवार साहेब येत असतील म्हणून शिंदे गटाचे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असेल असा टोला बचू कडू यांनी लगावला. मी मंत्रिपदाचा दावा सोडला मात्र, मुख्यमंत्रिपदाचा नाही असं देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.
दिल्ली ही फार अजबगजब आहे, त्यावर फार विश्वास ठेवु नये असं मला पहिल्यापासून वाटत. दिल्लीच्या नेत्या समोर झुकण्यापेक्षा गल्लीतील माणसा समोर मुजरा केला पाहिजे अस मला वाटत. दिल्लीने बऱ्याच वेळा दगा फटका केला आहे. अजित दादा हे दादा आहेत. त्यामुळे त्यांना झुकत माप दिल असेल. लोकशाही हे मताचे गणित आहे. ते सामान्य माणसाच्या मतातून येत, नाहीतर आमदार पळवुन देखील येत. एकनाथ शिंदे यांना थोडी दाडी आहे म्हणून मी त्यांच्या सोबत आहे.