ठाकरे कुटुंबियांवर आघात, बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

संजीवनी करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: May 13, 2022, 02:09 PM IST
ठाकरे कुटुंबियांवर आघात, बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन title=

पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन झालं आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. ३८ वर्षे त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केलं होतं.

शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या 'आत्या' आहेत. तर, चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत.

संजीवनी करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून करंदीकर कुटूंबियांचे फोनवरुन सांत्वन केले आहे. तसेच मुख्यमंत्री सायंकाळी त्यांच्या अंत्यविधी संस्काराला उपस्थित रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.