Baramati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Vote Counting: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. लोकसभा निवडणूक 2024 निकालाचा कौल सुरु झाला आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशा या सामनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं भवितव्य आज ठरतं. आतापर्यंत आलेल्या आकडेनुसार नणंद - भावजयच्या या लढतीमध्ये नणंद आघाडीवर आहे.
दहावी फेरीमध्ये सुप्रिया सुळे 48365 मतांनी आघाडीवर, अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी बारामतीमधील लढत ही प्रतिष्ठेची आहे. गेल्या निवडणुच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली असली तरी बारामतीकरांनी 59.50 टक्के मतदान केलं. गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये भाजपचे राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळेंच्या विरोधात रिंगणात उभा ठाकल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी कांचन यांना 1 लाख 30 हजार मतांनी पराभव करुन विजय मिळवला होता.
तर 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव केला होता. पण यंदा बारामतीचं चित्र खूप वेगळं होतं. इथे पवार विरुद्ध पवार म्हणजे पवार कुटुंब एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काका पुतण्याची प्रतिष्ठा आणि नंदन भावजय यांची लढत देशाने पाहिली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे बारामतीकर काय कार्यकर्तेही कोणाचा प्रचार करायचा यामुळे संभ्रमात होते.
बारामतीमधील ही लढत पवार कुटुंबासाठी जेवढी प्रतिष्ठेची होती तेवढीच राजकीयदृष्ट्या ती महत्त्वाची आहे. त्यामुळे अख्ख पवार कुटुंब प्रचारात उतरलं होतं. कोणी नंनदेच्या पाठीशी उभं होतं तर कोणी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत होते. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी लढत पाहिला मिळाली. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांची घड्याळ चालणार की सुप्रिया सुळे यांची तुतारी वाजणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.