भीमा कोरेगाव पडसाद : औरंगाबाद, पुण्यामध्ये उद्याचे पेपर पुढे ढकलले, शाळा बंद

पुण्यातील भीमा कोरेगावामधील पडसात संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. उद्याही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. त्यामुळे पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठाने उद्याचे पेपर पुढे ढकलेत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 2, 2018, 10:04 PM IST
भीमा कोरेगाव पडसाद : औरंगाबाद, पुण्यामध्ये उद्याचे पेपर पुढे ढकलले, शाळा बंद title=

औरंगाबाद, पुणे : पुण्यातील भीमा कोरेगावामधील पडसात संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. उद्याही महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. त्यामुळे पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठाने उद्याचे पेपर पुढे ढकलेत.  

मुंबईत स्कूल बस बंद

दरम्यान, मुंबईतही उद्या स्कूल बस न चालवण्याचा निर्णय काही संघटनांनी घेतल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालक संघटनेने हा निर्णय घेतलाय. दर औरंगाबादमधील डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे उद्याचे पेपर पुढे ढकलले आहेत.

औरंगाबादमध्ये शाळा बंद

तसेच औरंगाबादमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्याची माहिती देण्यात आलेय. तसेच पुण्यातही भीमा कोरेगाव पडसादानंतर उद्या होणारे पेपर पुढे ढकल्याची माहिती पुणे विद्यापीठाने दिलेय.