गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर

Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.

Updated: Mar 22, 2023, 03:31 PM IST
गुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर

Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये देवगड, रत्नागिरी भागातून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. जवळपास 55 हजार ते 60 हजार पेट्या रोज येत आहेत. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झालाय. तसेच मार्चअखेरपर्यंत आवक आणखी वाढणार आहे. दरम्यान, राज्यत अवकाळी पावसाचा फटका आंबा व्यवसायालाही बसला आहे.

सध्या 2200 रुपयांपासून ते अगदी 5000 रुपये डझन या रेंजमध्ये आंबे मिळतील. हे दर एक्स्पोर्ट क्वालिटी आंब्याचे आहेत. मात्र सरासरी आंब्याचे दर 900 ते 1200 रूपये डझन या रेंजमध्ये आहेत. यावर्षी आंब्याचं उत्पादन चांगलं झाले आहे. तसेच आवकही वेगाने सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत आवक आणखी वाढणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आंबा मार्केटमध्ये मंदी होती. निर्बंधांमुळे आवकही कमी होती. पण यावर्षी तशी स्थिती नाही. गेल्यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि त्यानंतर फेब्रुवारीतली उष्णता यामुळे आंबा पीक भरघोस आलंय असं व्यापारी सांगतात. सध्या काहीसे चढे असलेले दर मार्चअखेरपर्यंत आणखी उतरतील असं सांगितलं जात आहे. 

फळबाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामपूर्व आंब्याची आवक झाल्याने दोन डझनाच्या एका पेटीस रविवारी 2100 रुपये दर मिळाला होता. जानेवारी महिन्यापर्यंत हंगामपूर्व कमी प्रमाणात आवक होत राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता चांगली आंब्याची आवक झाली आहे. दरवर्षी हंगामात रत्नागिरी हापूस आंब्याची फेब्रुवारी महिन्यापासून आवक होत असते. पण हवामानातील बदलाचा फटका बसला आहे.

गेल्यावर्षी हंगामपूर्व आंब्याच्या एका डझनाच्या पेटीला 3500 रुपयांचा दर मिळाला होता. त्यातुलनेत एका डझनामागे 1150 रुपयांनी घट झाली होती. यंदा आंब्याला पोषक हवामान होते. पोषक हवानामानामुळे आंब्याचे उत्पादन चांगले आले होते. मात्र, अवकाळी पावसाने आंबा बागायदारांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा आणि काजू पिकाला यावेळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे ऐन हंगामात आंबा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडला आहे.