Big News : शिवसेनाच मोठा भाऊ; जितेंद्र आव्हाड यांचे लक्षवेधी विधान

Maharashtra politics : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. शिवसेनाच मोठा भाऊ असेल असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 24, 2024, 06:53 PM IST
Big News : शिवसेनाच मोठा भाऊ; जितेंद्र आव्हाड यांचे लक्षवेधी विधान  title=

Jitendra Awhad : मुंबईतल्या विधानसभेच्या 36 जागांसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच दिसून येतेय... 36 जागांपैकी 20 ते 22 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दुसरीकडे काँग्रेस 13 ते 15 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 5 ते 7 जागांवर दावा सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. दुसरीकडे मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ असेल असं महत्त्वाचं विधान जीतेंद्र आव्हाडांनी केलंय.. 

मुंबईतल्या जागावाटपात चांदिवली आणि वांद्रे पूर्व या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.. चांदिवलीतून शिवसेनेकडून दिलीप लांडे निवडून आले होते.. मात्र ते नंतर शिवसेना शिंदे गटात गेली.. तेव्हा चांदिवलीच्या जागेवर नसीम खान लढण्याची शक्यता आहे.. तर दुसरीकडे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा वांद्रे पूर्वमधून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणूक लढवण्याची शक्यता आहे...