पुण्यात भीषण अपघात; टँकरची मिनीबसला धडक, 2 जणांचा मृत्यू 12 जखमी

कात्रज बायपासवर सलग दुस-या दिवशी भीषण अपघात

Updated: Oct 22, 2021, 10:10 PM IST
पुण्यात भीषण अपघात; टँकरची मिनीबसला धडक, 2 जणांचा मृत्यू 12 जखमी

अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे: कात्रज बायपास मार्गावर भीषण अपघात झाला आहे. केमिकल टँकर उलटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. या टँकरने मिनिबसला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. तर रस्त्यावरील वाहातूक थांबवण्यात आली आहे. 

पुण्यात कात्रज बायपासवर सलग दुस-या दिवशी भीषण अपघात झाला आहे. केमिकलचा टँकर उलटल्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. टँकरची धडक बसल्यानं एक मिनिबस पुलावरून खाली सर्व्हिस रोडवर कोसळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या अपघाता दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात अनेक जण जखमी झालेत. रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. गुरुवारीही याच ठिकाणी अपघात होऊन दोघं दगावले होते.