राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर; पाहा कोणाला मिळालं स्थान

राज्यसभेत भाजपकडे एकूण तीन जागा आहेत

Updated: Mar 11, 2020, 06:44 PM IST
राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर; पाहा कोणाला मिळालं स्थान  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : राज्यसभेच्या सात जागांसाठी आता भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिपाईच्या रामदास आठवले यांना आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान देण्यात आलं आहे. या यादीतील ही दोन नावं वगळता तिसऱ्या नावाविषयी मात्र गोपनियता पाळण्यात आलेली आहे. 

राज्यसभेत भाजपच्या कोट्यात एकूण तीन जागा आहेत. ज्यासाठी भाजपकडून दोन नावं जाहीर करण्यात आली असली तरीही तिसऱ्या नावाविषयीची उत्सुकता कायम आहे. तेव्हा आता या जागेवर कोणाच्या नावाला प्राधान्य दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  ज्येष्ठ भाजप नेते निष्ठावंत नेते एकनाथ खडसे यांच्या वाट्याला राज्यसभेसाठीची उमेदवारी जाऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान आता पहिल्या दोन नावांमध्ये तर, त्यांचा समावेश नाही. पण, गुलदस्त्यात असणारं तिसरं नाव तरी खडसेंचं असणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

एकिकडे भाजपक़डून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असतानाच तिथे राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीतील तिढा कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यात सात जागांवर राज्यसभेची निवडणूक होत आहे.  महाविकासआघाडीच्या चार तर भाजपच्या तीन जागा यात निवडून येऊ शकतात. १३ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे.