'पॅडमॅन सिनेमा'ला भाजप नगरसेवकांची दांडी

 भाजप नगरसेवक आणि पदाधिका-यांनी पॅडमॅनच्या खेळाला दांडी मारल्याचं दिसून आलं. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2018, 11:24 PM IST
'पॅडमॅन सिनेमा'ला भाजप नगरसेवकांची दांडी  title=

पुणे :  सॅनिटरी नॅपकीनचा वापर तसंच त्याची योग्य विल्हेवाट लावणं याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूनं, पुण्यातल्या  भाजप नगरसेवकांसाठी पॅडमॅन सिनेमाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता.

खेळाला दांडी 

 नवभारत निर्मितीनं याचं आयोजन केलं होतं. या वेळी महापौर मुक्ता टिळक, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह काही निवडक भाजप नगरसेवक वगळता, इतर भाजप नगरसेवक आणि पदाधिका-यांनी पॅडमॅनच्या खेळाला दांडी मारल्याचं दिसून आलं. 

संवेदनशील पुणेकर 

त्यामुळे खरंच पुणे पालिकेचे सत्ताधारी या विषयाबाबत संवेदनशील आहेत का असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.