'तालुक्यात फिरु देणार नाही' हर्षवर्धन पाटलांना मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच खुलेआम धमकी

Harsh Vardhan Patil is Threatened:  धमक्यांमुळे व्यथित झालेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना पत्र लिहिले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 4, 2024, 02:25 PM IST
'तालुक्यात फिरु देणार नाही' हर्षवर्धन पाटलांना मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच खुलेआम धमकी title=
Harsh Vardhan Patil threatened

Harsh Vardhan Patil is Threatened: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. इंदापूर तालुक्यात फिरु न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी केलाय. इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलाय.

सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय..ही बाब गंभीर असून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांकडे केलीय.. 

आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही तालुक्यात फिरु देणार नाही. माझ्या सारख्या माणसाला धमक्या येतात. भविष्यात फिरु देणार नाही, असं जाहीर वक्तव्य केलं जातं. याच्या क्लिपिंग आहेत. अशा धमक्या आल्या तर काम कसं करायच? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. 

भाषणातून खुलेआम धमकी

आता निवडणुकीचं वातावरण तयार झालं. जेथे मी आमदार राहिलो. तेथे मित्रपक्षाचे पदाधिकारी भाषणातून खुलेआम धमकी देतात. ही बाब गंभीर आहे. हे एवढ्यावरच थांबेल असे मला वाटत नाही. भविष्यात काही विपरित घडू नये. यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिल्याचे ते म्हणाले.

धमक्यांमुळे व्यथित

मित्रपक्षांचे पदाधिकाऱ्यांचे शिवराळ भाषेतील वक्तव्य आणि धमक्यांमुळे व्यथित झालेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना पत्र लिहिले आहे. 

सुरक्षेची चिंता

तालुक्यात फिरु न देण्याची धमकी आल्याचा दावा त्यांनी या पत्रात केलाय. आपल्याला सुरक्षेची चिंता वाटत असून सुरक्षेकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.