सोलापूर : राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोलापूर (Solapur) दौऱ्यात भाजप (BJP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज सरकोलीत आलेल्या शरद पवार यांनी कल्याण काळे यांचे नाव घेत परिसराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा आवाहन केले.
भारत नाना माझ्यावर नेहमीच अचल निष्ठा ठेवणारे असे जीवाभावाचे सहकारी होते. आयुष्यात काही राजकीय प्रसंग उद्भवले असतील तरी त्यांचे बारामतीशी नाते कधीही तुटले नाही. पंढरपूरकरांनीही त्यांना नेहमीच साथ दिली, तुमच्या प्रेमाची शक्ती त्यांना स्वर्गातही लाभो. pic.twitter.com/yhdXWJwHkq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 18, 2020
लोकसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले कल्याण काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माढा, सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. पण त्यांची संधी हुकली. कल्याण काळे यांचा एक सहकारी आणि एक खासगी असे दोन साखर कारखाने आहेत.