भाजप नेत्यावर हल्ला, शिवसेना मंत्र्याच्या मुलावर आरोप

मालेगाव पंचायत समिती भाजप सदस्य विक्की खैरनार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे

Updated: Dec 19, 2017, 09:12 PM IST
भाजप नेत्यावर हल्ला, शिवसेना मंत्र्याच्या मुलावर आरोप title=

मालेगाव : मालेगाव पंचायत समिती भाजप सदस्य विक्की खैरनार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. विक्की खैरनार आपल्या होंडा सिटी गाडीतून कॅम्प रस्त्यावरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरानी त्यांची गाडी अडवली आणि हल्ला केला. त्यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. या हल्ल्यात खैरनार जखमी झाले.

हल्ल्याचं वृत्त कळताच भाजपा नेते अद्वय हिरेंनी घटना स्थळी पोहचले. शिवसेनेचे मंत्री दादा भूसे यांच्या मुलानं हल्ला केल्याच्या आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन करत हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी दादा भुसेंचा मुलगा आविष्कार भुसे याच्यासह 3 जणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.