नागपूरमध्ये पोलिसांसमोरच २ गटांमध्ये हाणामारी

नागपूर जिल्ह्यातल्या कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगावमध्ये पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली.

Updated: Dec 19, 2017, 08:22 PM IST
नागपूरमध्ये पोलिसांसमोरच २ गटांमध्ये हाणामारी title=

नागपूर : नागपूर जिल्ह्यातल्या कुही पोलीस ठाण्यांतर्गत पाचगावमध्ये पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली. मात्र यावेळी पोलिसांनी मूक दर्शक बनून राहण्यातच धन्यता मानली.

पाचगाव जवळ रस्त्यावर वाहन चालवताना काही युवकांमध्ये सुरु झालेला किरकोळ वाद नंतर वाढला. म्हणून एक गट पोलीस तक्रार करायला गेला असता, दुस-या गटानं तिथं येऊन पोलिसांसमोरच लाठयाकाठयानी तक्रारदारांना बदडून पळ काढला. या हाणामारीत 4 जण जखमी झालेत. या प्रकरणी फरार आरोपींचा शोध सुरु आहे.