पुणे : महापालिकेच्या महत्त्वाच्या स्थायी समितीच्या लॉटरीत सत्ताधारी भाजपला धक्का बसलाय. विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे चौघे सदस्य स्थायीतून बाहेर पडलेत.
स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. महापालिका निवडणुकीनंतरचं पहिलं वर्ष असल्याने आठ सदस्य एका वर्षात निवृत्त होत आहेत. हे आठ सदस्य कोण असतील हे चिठ्ठया टाकून ठरवण्यात आलं. त्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेस शिवसेना यांचा प्रत्येकी एक अशा आठ सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघाल्याने त्यांना स्थायीतून बाहेर पडावं लागणार आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत या सदस्यांची मुदत असेल. त्यांच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या मुख्यसभेत केली जाणार आहे. चिठ्ठ्यांच्या या लॉटरीत स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच विकेट निघालीय.