पुणे स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक

स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक यांची वर्णी लागलीय. मुळीक वडगाव शेरीचे नगरसेवक असून भाजप आमदार जगदीश मुळीक यांचे बंधुआहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2018, 11:19 PM IST
पुणे स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक title=

पुणे : स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक यांची वर्णी लागलीय. मुळीक वडगाव शेरीचे नगरसेवक असून भाजप आमदार जगदीश मुळीक यांचे बंधुआहेत.

१०१८-१९ वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक तसेच सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांचे बंधु सुनील कांबळे यांचे नाव आघाडीवर होते. हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचे नावदेखील चर्चेत होते. मात्र या चुरशीत मुळीक यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. 

अध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांचा मार्ग मोकळा झालाय. सध्याचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना इश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून स्थायी समितीतून बाहेर पडावं लागलं. त्यांच्यानंतर कुणाकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या जातात याबद्दल उत्सुकता होती.