नशेत कार चालकाने दोन दुचाकी स्वारांना चिरडले

Pune Car Accident : नशेत असलेल्या कार चालकाने दोन दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी सर्कल जवळ काल रात्री घडली.  

Updated: Jul 28, 2022, 08:24 AM IST
नशेत कार चालकाने दोन दुचाकी स्वारांना चिरडले title=

पुणे : Car driver crushed two bike riders in Pune : नशेत असलेल्या कार चालकाने दोन दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी सर्कल जवळ काल रात्री घडली. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जखमी असून त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अपघातात योगेश पवार आणि विपील हळदकर हे दोघे जखमी झाले आहेत. हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेंद्र सिंह (रा.ललित, सी-405)  हा कारचालक दारुच्या नशेत भरधाव वेगात कार चालवत होता. त्याच्यासोबत कारमध्ये त्याचे कुटुंबही होते. 

नांदेड सिटी येथील सर्कल जवळील या अपघातप्रकरणी कारचालक अमेंद्र सिंह याला हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.