आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयचं आरोपपत्र दाखल

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती. 

Updated: Dec 6, 2017, 08:21 PM IST
आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयचं आरोपपत्र दाखल  title=
Image Credit News Hour

पुणे : सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती. 

एक्स्प्रेस हायवेला लागून असलेली सुमारे १८०० एकर जमीन हडपल्या प्रकरणी म्हैसकर यांच्याविरूद्ध १५ ऑक्टोबर २००९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १० जानेवारीला सतीश शेट्टींची हत्या झाली. दरम्यान, जमीन हडपल्या प्रकरणी आता सीबीआयच्या आरोपपत्रात म्हैसकर यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलंय.