घरावर सीबीआयचा छापा, नवी मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य; सुसाईड नोटमध्ये कोणाचा उल्लेख?

Customs officer mayank singh:  अधिकाऱ्याच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कस्टमने जप्त केलेले माल सोडण्यासाठी त्याच्या वरिष्ठांकडून दबाव आणल्याचा उल्लेख आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 27, 2023, 10:22 AM IST
घरावर सीबीआयचा छापा, नवी मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य; सुसाईड नोटमध्ये कोणाचा उल्लेख? title=

Customs officer mayank singh: नवी मुंबई कस्टम अधिकारी मयंक सिंग यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. सीमाशुल्क विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मयंक सिंग या अधिकाऱ्याच्या घरावर दोन दिवसांपूर्वी सीबीआयने छापा टाकला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज सिंह यांनी नवी मुंबईतील तळोजा तलावात उडी मारून आपले आयुष्य संपवले आहे. 

सीबीआयने मयंक सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी मयांक यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. मयंकने लाच घेऊन सीमा शुल्क विभागातील प्रलंबित असलेली दोन बिले मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अधिकारी मयंक सिंग यांच्या आत्महत्येनंतर खारघर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आत्महत्या केलेा हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलीस करत होते. पोलिसांनी यासंदर्भात सर्वत्र चौकशी सुरु केली. अखेर पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटली. या मृत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असे असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते, असे पोलीस तपासात समोर आले.

मात्र, अधिकाऱ्याच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कस्टमने जप्त केलेले माल सोडण्यासाठी त्याच्या वरिष्ठांकडून दबाव आणल्याचा उल्लेख आहे. या सुसाईड नोटमध्ये तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.