मुंबई: गोवा आणि कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळचा इशारा हवामान खात्यानं दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळला आहे. या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालाय. उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय...
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपूरकरांना शनिवारी पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा दिलाय. संध्याकाळच्या वेळी अचानक आलेल्या पावसानं नागपूरकरांची त्रेधा उडाली... पण विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसानं वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केला. या पहिल्या पावसाचा आनंद नागपूरकरांनी घेतला. पण उपराजधानीच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना अंधाराचा सामना देखील करावा लागला.