मराठवाडा - विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता

सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे.  त्यामुळे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 28, 2020, 04:35 PM IST
मराठवाडा - विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता title=
संग्रहित छाया

मुंबई : सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. दोन दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात किंवा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. म्हणजे आता हिवाळा संपून उन्हाळा सुरु होत असल्याने राज्याच्या तापमानात काही प्रमाणात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह कोकण विभागात उष्ण लहरींमुळे तापमानात झालेली वाढ येत्या काही दिवसांत कमी झालेली पहायला मिळणारेय. काही भागात गारपीट, काही भागात तापमान अधिक तर काही भागात तापमानात घट पाहायला मिळत आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दरम्यान,  राज्याच्या तापमानात सध्या झपाट्याने बदलले आहे. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. त्याचवेळी कोकण विभाग वगळता राज्याच्या इतर भागांत सध्या रात्रीच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाल्यानं थंडीचे आगमन झाले आहे.

उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने पुन्हा येऊ लागलेत. किनारपट्टीच्या भागात मात्र उष्ण वाऱ्यांचे प्रवाह आहेत. परिणामी कोकण विभागात सध्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.