Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील, एकही मराठा शिल्लक राहणार नाही, याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला.
इंदापुरात भुजबळांनी ओबीसी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी हर्षवर्धन पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकिट घेणार का? मोहिते पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार का? असा सवालही भुजबळांनी केला(Maharashtra Politics).
अति मागास करून त्यांना सेफ ठवले आहे. सध्या 27 टक्के आरक्षण आहे. पण नोकऱ्या 9.5 टक्के इतक्या आहेत. आधी आमचे 27 टक्के आरक्षण पूर्ण भरा, अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली. OBC आरक्षणात त्यांना आरक्षण दिले. त्यांना का दिले असे आम्ही म्हणत नाही. काही जास्त मागत नाही. पण, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी आमची भूमिका असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.
राज्यात काही सुजाण मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा समाजाचे अनेक बडे नेते आहेत. एकही नेता यावर बोलत नाही. या नेत्यांना बोलायला कसली भती वाटतेय? 80 टक्के मते आमची आहेत. कोण कुणबी सर्टिफिकेट घेणार आहेत? हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, काकडे यांना विचारा कुणबी सर्टिफिकेटपाहिजे का? कोणीही बोलायला तयार नाहीत. कारण निवडणूक आहेत असे भुजबळ यावेळी म्हणाले.
राज्यात अशांतता कोण माजवत आहे ते पाहा. तुला 24 नंतर दाखवतो अशा प्रकारची भाषा जरांगे वापरतात .काय चाललं आहे हे सगळ। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. तुम्ही जर दादागिरी करणार असाल तर तुमच्या दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिले जाईल, अस इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते तेथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. विधानसभेत उपमुख्यमंत्री यांनी लेखी उत्तर दिले आहे असे भुजबळ म्हणाले. या दगडफेकीत एकूण 80 पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही बाब तेव्हा पुढे आली असती तर जरांगेंना सहानुभूती मिळाली नसती अशी टीकाही भुजबळ यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षणावरुन जरांगेंनी थेट सरकारला इशाराच दिलाय. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण द्या, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल असा इशारा जरांगेंनी आज नांदेडमध्ये दिलाय.. छगन भुजबळांच्या दबावामुळे मराठा आरक्षणावर राज्य सरकारने भूमिका बदलू नये असा सल्लाही जरांगेंनी दिलाय.