सिडकोची लॉटरी, १५ हजार घरांची नवीन वर्षात भेट

सिडकोच्या घरांची सोडत जाहीर नवीन वर्षात निघणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही गुजन्यूज आहे. सिडकोकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे बांधण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 22, 2017, 07:01 PM IST
सिडकोची लॉटरी, १५ हजार घरांची नवीन वर्षात भेट title=

 नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत जाहीर नवीन वर्षात निघणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही गुजन्यूज आहे. सिडकोकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे बांधण्यात येणार आहे.

नवीन वर्षात सिडकोची भेट

याआधी खारघर आणि उलवे येथील गृहप्रकल्पातील सिडकोच्या शिल्लक ३८० सदनिकांसाठी संगणक पद्धतीने सोडत सिडको भवन येथे काढण्यात आली होती. या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर www.cidco.maharashtra.gov.in करण्यात आले होते.

घरांची सोडत नवीन वर्षात 

आता नवीन वर्षांत १५ हजारांपेक्षा जास्त घरे सिडकोकडून बांधण्यात येणार आहेत. याची सोडत नवीन वर्षात तसेच नवीन आर्थिक वर्षात काढण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली.

२०१९ डिसेंबरपर्यंत ताबा

२०१९ डिसेंबरपर्यंत ताबा देण्यात येणार आहे. तळोजा येथील ८५०० घरांना पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. घणसोली, द्रोणाचारी, कळंबोली, खारघर येथे ही घरे उभारण्यात येणार आहे. एकूण १५, ११५ घरे सिडकोकडून या भागात उभारण्यात येणार आहेत.