नागपूर : नागपूर शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार आणि स्वागतासाठी व्यासपीठावर एकच गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री झाल्यावर मी शिवसैनिकांना भेटत आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून आलो आहे. हे आव्हान मोठं आहे. अजून प्रश्न तेच आहे. आम्ही हिंदुत्ववादीच आहोत. असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आम्ही हिंदूच आहोत, धर्मांतर केलेलं नाही, असं मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात ठणकावलं आहे. त्याचवेळी कुणी हिंदुत्वाचा बुरखा घालून देशाच्या मुळावर घाव घालत असेल तर त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत केंद्रातील मोदी सरकारचा समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेला अखंड हिंदुस्थान करून दाखवा, असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं. आपण वचनाला पक्के असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, तुमचा कुटुंबप्रमुख आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. एक वेगळी दिशा आपण देशाला देत आहोत. मी विधानसभेत जे बोल्लो तेच बोलतोय. हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालत असेल तर त्यांना कोणी माफ करणार नाही. कर्जमुक्त करते की नाही, शेतकऱ्यांना मदत करते की नाही निवेदनांवर निवेदन. मी जिथे जातोय तिथे निवेदनांचा पाऊस. कोणाला नोकरी, कोणाला घर, कोणाला कर्जमुक्ती पाहिजे. हे दृश्य आजच्या क्षणासाठी नव्हे तर कायमस्वरुपी हवं आहे. जनतेचा आशीर्वाद हवा आहे. सत्ता आहे तर वेडंवाकडं वागून चालणार नाही जबाबदारीने वागलं पाहिजे. जनतेशी नम्र राहायची शिकवण शिवसेना प्रमुख म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मला पूर्ण नागपूर भगव करायचं आहे. आता जबाबदारीने वागले पाहिजे. सत्ता आल्यानंतरही नम्रता असली पाहिजे देशासमोर जो आगडोंब उसळला आहे. सावरकरांवरून आपल्यावर आले होते. अखंड हिंदुस्थान करण्यासाठी युती केली. आम्ही जे बोलतो तेच करतो
आपल्या देशात जे पीडित किती येणार याची माहिती नाही. काश्मिरी पंडिताकरता शिवसेना प्रमुख बोलले होते. देशात जे प्रश्न आहे त्याकडे दुर्लक्ष करताय. नागरिकत्व बिलाला जे विरोध करता त्याला देशद्रोही ठरवतात.'