खान्देशात थंडीचा कहर, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

हुडहुडी भरणारी थंडी असल्यानं नागरिकांना सकाळी बाहेर पडणे जिकिरीचं झालंय.

Updated: Dec 16, 2018, 02:14 PM IST
खान्देशात थंडीचा कहर, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत  title=

धुळे : खान्देशात थंडीने अक्षरशः कहरच केलाय. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट आलीय. पारा ७.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. चांगला पाऊस पडला नसला तरी कडाक्याची थंडी पडल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय. रस्त्यावर दिसणारी रहदारी अत्यंत तुरळक झालीय. तिकडे जळगावमध्येही पारा  ७ ते ८ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली घसरलाय. गेल्या तीन  दिवसांपासून पारा एकेक अंशाने खाली येतोय. यामुळं वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झालाय.

बाहेर पडणं जिकरीचं 

हुडहुडी भरणारी थंडी असल्यानं नागरिकांना सकाळी बाहेर पडणे जिकिरीचं झालंय. रस्ते ओस पडू लागलेय,  नागरिकांना सकाळी घराबाहेर पडताना स्वेटर, टोपी, रुमाल, शाल या उबदार कपड्याचा वापर करावा लागतोय.

शेतकरी सुखावला

 दरम्यान, रब्बीच्या पिकांना ही थंडी पोषक असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळं एकीकडं थंडीचा त्रास असला तरी पिकांना गुणकारी असलेल्या थंडीने दुसरीकडे शेतकरी मात्र सुखावलाय.