close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शिवसेनेकडून ऑफर, मला फोडण्यासाठी २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

Updated: Aug 1, 2019, 09:07 PM IST
शिवसेनेकडून ऑफर, मला फोडण्यासाठी २५ फोन - विजय वडेट्टीवार

चंद्रपूर विधानसभेतले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला वांद्र्यावरून आतापर्यंत किमान २५ फोन आल्याचा त्यांचा दावा आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने भाजपाने एक विरोधी पक्षनेता नेल्यानंतर आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत नेण्याच्या खटपटी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितले. या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुनही मला फोन आला होता. पण मी फोन उचलून जिथे आहे तिथे खूप असल्याचे त्यांना सांगितले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजप प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश केला.