नाना पटोलेंचा 'सरंजामी' प्रताप आणि राजकीय ठणाणा; चूक मान्य न करता लंगडं समर्थन!

Nana Patole muddy feet: . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले.

Updated: Jun 18, 2024, 09:33 PM IST
नाना पटोलेंचा 'सरंजामी' प्रताप आणि राजकीय ठणाणा; चूक मान्य न करता लंगडं समर्थन! title=
Nana Patole muddy feet

Nana Patole muddy feet: सरंजामी प्रवृत्ती जोपासणा-या नाना पटोलेंसंदर्भात एक बातमी आज दिवस चर्चेत राहिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले... त्यावरून टीकेची चिखलफेक कशी सुरू झालीय, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

अकोल्यातून चीड आणि संताप आणणारी दृश्यं आज दिवसभर चर्चेत राहिली. ज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गाडीत बसलेत आणि काँग्रेसचा कार्यकर्ता चक्क त्यांचे चिखलात माखलेले पाय धुतोय... अकोल्याच्या वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन नाना पटोलेंनी घेतलं. मात्र इथं पावसामुळं प्रचंड चिखल झाला होता. चिखलातून वाट काढत नानांनी दर्शन घेतलं.. त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतलं... पटोलेंच्या या सरंजामी वृत्तीवर त्यांच्या विरोधकांनी सडकून टीकेची झोड उठवलीय...

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घमासान! विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक जाहीर

छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'

एकीकडं पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणा-या नानांची बाजू लावून धरलीय..

दरम्यान, कार्यकर्त्यानं फक्त पाणी ओतलं... पाय आपणच धुतले, असं स्पष्टीकरण वादानंतर नाना पटोलेंनी दिलं.

खरं तर झाल्या प्रकाराबाबत नानांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती... मात्र चूक मान्य न करता, लंगडं समर्थन करण्यावर त्यांनी भर दिला... शेतक-याचा मुलगा असलेल्या नानांकडून असं सरंजामी वागणं नक्कीच बरं नव्हं...

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट