नाशिकमध्ये कोथिंबीर ३०० रूपये जुडी

राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली. 

Updated: Nov 4, 2019, 02:03 PM IST
नाशिकमध्ये कोथिंबीर ३०० रूपये जुडी title=

मुंबई : राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली. तर नाशिकमध्ये कोथिंबीरने ३०० रूपयांचा आकडा गाठला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या जुडीला ३०० रूपये दर मिळाला आहे. आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरच्या दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. 

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. यामुळे भाजीपाल्यावरही याचा परिणाम झाला. सर्वात जास्त परिणाम हा पालेभाज्यांवर झालेला दिसतो. कोथिंबीर आणि पालेभाज्यांचे भाव एकाच दिवसात वाढलेले आहेत. 

चांगल्या प्रतीची पालेभाजी येत नसल्याने ग्राहकही कमी झाले आहेत. असं भाजी विक्रेत्यांचे म्हणणं आहे. पुढील काही दिवस असेच पालेभाज्यांचे भाव चढे राहतील असं म्हटलं जातंय.