ठाणे : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. सुरक्षा ताफ्यातील पोलीस, सहाय्यक, स्वयपाकी आणि स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड हेही आता होम क्वारंटाईन झाले आहेत. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
BreakingNews । गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, सुरक्षा ताफ्यातील पोलीस, सहाय्यक, स्वयपाकी आणि स्वच्छता कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, आव्हाडही होम क्वारंटाईन #CoronaVirus #CoronaInMaharashtra @ashish_jadhao pic.twitter.com/D5td4iZIel
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 14, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा सेवेत दाखल असलेल्या ५ पोलिसांसह त्यांचे सहाय्यक, बंगल्यातील स्वयपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि काही कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. आधी १३ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यात तीनने वाढ झाली आहे. स्वतः जितेंद्र आव्हाडही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा मुंब्रा परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी एकाच दिवशी ठाण्यात आता ३० नवे रुग्ण सापडल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे.
राज्यात आज ३५२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २३३४ अशी झाली आहे. यापैकी २२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2020