कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे

सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. 

Updated: Dec 1, 2020, 02:46 PM IST
कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे  title=
संग्रहित छाया

जालना : कोरोना लस (व्हॅक्सिन) (Corona vaccine) लवकर यावी ही आशा, व्हॅक्सिन (vaccine) देण्यासाठी नियोजन सुरु आहे. पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना सर्वात आधी डॉक्टर्स, पोलिसांसोबत वृद्ध नागरिकांना कोरोनाची लस देणार आहोत. सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. 

कोरोना व्हॅक्सिन लवकर येण्याबाबत आशा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यात येईल आणि तसे नियोजन सध्या सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून आणि केंद्र सरकारच्या प्रोटोकॉल नुसारच कोरोना व्हॅक्सिन देण्यात येईल, असेही टोपे म्हणाले. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यासंदर्भात कोणतीही मागणी नाही, असेही टोपे म्हणाले.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीष चव्हाण पदवीधर मतदारसंघात हॅट्रिक साधणार, असा विश्वास आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला. टोपे यांनी जालन्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते बोलत होते. आज मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी होतील, असा विश्वास देखील टोपे यांनी व्यक्त केला.