...हे योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांचा अखेरचा इशारा

कोरोनाची ( Coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहता कामा नये. जे आखून दिलेले निर्बंध आहेत. त्याचे तंतोतंत पाळण होणे आवश्यक आहे.  

Updated: Jun 19, 2021, 05:43 PM IST
...हे योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांचा अखेरचा इशारा  title=

पुणे : कोरोनाची ( Coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहता कामा नये. जे आखून दिलेले निर्बंध आहेत. त्याचे तंतोतंत पाळण होणे आवश्यक आहे. निर्बंध शिथील होताच लोकांची गर्दी दिसून येत आहे. हे योग्य नाही. विकेंडला पर्यटनस्थळांकडे धाव घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अखेरचा आणि निर्वाणीचा इशारा आहे.

पुण्यातील दुकाने शनिवार, रविवार बंदच राहणार आहेत. पुण्यात विकेंड लॉकडाऊन कडकडीत पाळला जाणार आहे. विकेंडला नागरिक पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. राज्याबाहेर प्रवास करत आहेत, महाबळेश्वर, लोणावळ्यात गर्दी करत आहेत. हे चुकीचे आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार म्हणाले. ट्रेकिंगसाठी भटकणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावे, लागेल असा अखेरचा इशारा अजित पवारांनी दिला आहे. नागरिकांनी आता गांभीर्याने वागावे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या होती. त्यानंतर मुंबईने कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळत रुग्णसंख्या कमी करण्यावर भर दिला. आता मुंबई लेव्हल-1वर आली आहे. मात्र, पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढत होती. राज्यात पुण्याचा प्रथम क्रमांक लागत होता. त्यानंतर अजिर पवार यांनी टास्कफोर्सची बैठक घेत पुण्यातील कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमी करण्यावर भर द्या, असा आदेश दिला. त्यानंतर पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. 

मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. हा धोका कायम आहे. तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांना बाधा होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे अजितदादा म्हणाले.