धम्माल कम्माल ! दणा दणा अन् खणा खण, पंढरपूरच्या बिली बाऊडनची हवा...

Cricket News : मैदानात चौकार अन् षकटारांचा धुरळा उडलाय ! धम्माल कम्माल ! दणा दणा अन् खणा खण. बॉलर हैराण परेशान..अन् बॉलर बिथरला, टाकला वाइड.. अन् इतक्यात सगळ्यांच्या नजरा फिरल्या अंम्पायर अर्थात पंचाकडं...

Updated: Dec 11, 2021, 03:46 PM IST
धम्माल कम्माल ! दणा दणा अन् खणा खण, पंढरपूरच्या बिली बाऊडनची हवा...  title=

सागर आव्हाड, पुणे : Cricket News : क्रिकेटमध्ये अनेक चाहते खेळाडूंच्या वेगवेगळ्या स्टाईलचे फॉलोवर्स असतात. त्यांची स्टाईल ते फॉलो करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका अंपायरची हवा आहे. तो अंपायर आहे पंढरपूरचा. सोशल मीडियावर स्थानिक क्रिकेट टुर्नामेंट सामन्यात आपल्या वेगळ्या शैलीमुळे पंढरपूरचा अंपायर चांगलाच प्रसिद्धी झोतात झाला आहे. (बातमीच्या शेवटी व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा)

दीपक नाईकनवरे तथा DN रॉक असे या अंपायरचे नाव आहे. दीपकच्या अंपायरिंग शैलीचे 'लोकल टू ग्लोबल फॅन' झाले आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील दीपकचा फॅन झाला आहे. मायकल वॉनने दीपकचा एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे.

धम्माल कम्माल ! दणा दणा अन् खणा खण, पंढरपूरच्या बिली बाऊडनची हवा...

पंढरपूरमध्ये राहणारा दीपक सध्या महाराष्ट्राभर क्रिकेट सामन्यात अंम्पायर म्हणून काम करीत आहे. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या दीपकने 2013मध्ये डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भाग ही घेतला होता. काही तरी वेगळे करून दाखवण्याचे दीपकने लहानपणापासून ठरवलं होतं आणि आज तो क्रिकेट अम्पायर म्हणून राज्यभर प्रसिद्ध झाला आहे.  

दीपक हा प्रसिद्ध अंपायर बिली बाऊडन यांचा फॅन आहे. त्यांना पाहून दीपकला वेगळ्या स्टाईलने अंपायरिंग करण्याची प्रेरणा मिळाली. दीपक महाराष्ट्र टी- 20 स्पर्धेत प्रसिद्धी झोतात आला. त्याने एका सामन्यादरम्यान त्यांच्या वाईड बॉल अतिशय वेगळ्या पद्धतीने दिला. पुरंदर प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान जेव्हा गोलंदाजाने वाइड चेंडू टाकला तेव्हा पंचांनी याचा इशारा हाताने न देता त्यांनी आपल्या पायाचा वापर केला. त्याने डोक्यावर उभे राहात त्यांचे दोन्ही पाय हातासारखे बाजूला पसरत वाईडचा निर्णय दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जगभर याची चर्चा झाली. 

पाहा हा व्हिडिओ -