Cyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा

Cyclone Mandous: मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

Updated: Dec 11, 2022, 08:15 AM IST
Cyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा  title=

Cyclone Mandous: सध्या वातावरणात मोठा बदल झालाय. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्याता आला आहे. (cyclone news)  मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. ( Cyclone in Maharashtra) त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, कोकणासह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्याता आला आहे.

मंदौस चक्रीवादळामुळे समुद्र खवळला

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे.  त्याचा परिणाम रायगड किनारपट्टीलगतही होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीलगत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वादळामुळे कोकाणासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण

राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंदौस या चक्रीवादळामुळं दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे.

मंदौस चक्रीवादळाचा तामिळनाडूत मोठा फटका बसला. चक्रीवादळाची तीव्रता कायम असल्याने तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. अलर्टवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरमचा समावेश आहे. दरम्यान, या चक्रीवादाळाच महाराष्ट्रावर परिणाम होणार असल्याने तर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ होत असतानाच आता पावसाचीही शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्यीच शक्यता आहे. मंदौस या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशासह राज्यातही पाऊस पडू शकतो. तसेच तापमानात घट होण्याची शक्यता आहे.