पुण्यात दशक्रिया सिनेमाचे बुकींग थांबवले

'दशक्रिया' या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात येत होती. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 16, 2017, 04:06 PM IST
 पुण्यात दशक्रिया सिनेमाचे बुकींग थांबवले  title=

पुणे : दशक्रिया सिनेमाचे सिटी प्राईड मल्टीप्लेक्समधील बुकींग ब्राम्हण महासंघाने थांबविले आहे.

'दशक्रिया' या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडून करण्यात येत होती. 

 ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या 'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केलयं. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा आणि त्या अनुषंगाने अनेक जुनाट बाबींवर या सिनेमातून परखड भाष्य करण्यात आलयं. 'पद्मावती'चा वाद ताजा असतानाच दशक्रिया सिनेमाला झालेला हा विरोध खरचं कलाकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.