सोशल मीडियामुळे प्रचार साहित्याची मागणी घटली

सोशल मीडियामुळे प्रचाराचा पॅटर्न बदलला आहे.

Updated: Apr 11, 2019, 06:10 PM IST
सोशल मीडियामुळे प्रचार साहित्याची मागणी घटली title=

अश्विनी पवार, झी मीडिया पुणे : निवडणुकीच्या प्रचाराचा पॅटर्न आता बदलला आहे. एकेकाळी भोंगे, कर्णे घेऊन रिक्षातल्या प्रचाराचे दिवस आता निघून गेले आहेत. प्रचारसभा आणि प्रचार रॅली आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी तर एलईडी स्क्रिन असलेल्या गाड्यांचा वापर होत आहे. 

पुण्यात प्रचार साहित्याच्या दुकानाबाहेर सध्या कुणी प्रचारसाहित्य घेता का, असं विचारण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. कारण आता ताई माई अक्का विचार करा पक्काचा जमाना जाऊन सोशल मीडियावरच्या प्रचाराचा जमाना आला आहे. त्यामुळे प्रचार साहित्याची मागणी यंदाच्या निवडणुकीत तब्बल पन्नास टक्क्यांनी घटली आहे. फक्त डोक्यावरच्या उन्हाचं संरक्षण सोशल मीडियापासून होत नाही, त्यामुळे राजकीय पक्षांच्या टोप्यांना मात्र पूर्वीसारखीच मागणी आहे.

दुसरीकडे नेत्यांच्या कटआऊटची मागणी मात्र वाढली आहे. यासाठी पुण्यात कामगारांचीही मागणी वाढली आहे. सध्या पुण्यात कटआऊटस प्रचार पॅटर्न दिसतो आहे.  एका क्लिकवर प्रचंड जनसमुदायापर्यंत पोहोचू शकल्यानं सोशल मीडियावरचा प्रचार जोरात सुरु आहे.