Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. साहेब आणि दादा तेव्हाही वेगवेगळे नव्हते आणि आजही नाहीत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, अजित पवार म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे हे विधान आले आहे.
शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. अजित पवार भाजपाचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचार्णे यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
शिरुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीवेळी शरद पवारांचे समर्थक म्हणुन पोपटराव गावडे तर बाबुराव पाचार्णे अजित पवारांचे समर्थक असल्याचा शिरुरमध्ये प्रचार झाल्याचे खुद्दअजित पवारांनी सांगत दाखला दिला. आम्ही त्यावेळीही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही काळजी करु नका, असे ते म्हणाले.
वडिलधाऱ्यांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात यायला हवं त्यांनी शिकलं पहिजे पुर्वीपासून राजकारणात तरुणांमध्ये एक वेगळं आकर्षक आहे त्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणही सक्रिय राजकारण समाजकारणात यायला हवेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तरुणांना संधी देण्यासाठीचे संकेत शिरुरमध्ये दिलेत.
पंतप्रधान काही वेळात दगडूशेठ गणपती मंदिरात पोहचणार आहेत त्यानिमित्ताने दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक अशी विशेष सजावट करण्यात आलीय. तसंच मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.तसंच शिवाजीनगर ते मंडई हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची पुण्यात आंदोलन केलंय. पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात स्वागत नाही असे फलक आंदोलनात झळकावण्यात आलेत. आंदोलनात युवक क्रांती दलाचे कुमार सप्तर्षी, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे नेते मोहन जोशी सहभागी झालेत. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.