देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार; नवनीत राणांचा विश्वास

 युतीची गणितंही सोडवली जात आहेत. 

Updated: Nov 11, 2019, 06:26 PM IST
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार; नवनीत राणांचा विश्वास
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र राज्याच सत्तेचा महासंघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र पक्षांतर्गत चर्चांपासून युतीची गणितंही सोडवली जात आहेत. यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मात्र देवेंद्र फडणवीस हेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

सोमवारी रात्रीपर्यंत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणा आणि अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटणार असं वक्तव्य करत राणा यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींचे पडसाद साऱ्या देशातील राजकीय पटलावर उमटत असतानाच नवनीत राणा मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. 

राज्यातील राजकीय वर्तुळात कितीही हालचाली सुरु असल्या तरीही मुख्यमंत्री भाजपचाच असेल. यामध्ये वेळ दवडला जाऊ शकतो. पण, देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापना होईल असं म्हणत फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम असल्याचं लक्षवेधी वक्तव्य त्यांनी केलं. 

राणा यांचं हे वक्तव्य आणि राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या हालचाली पाहता नेमकं सत्तास्थानपनेदरम्यान कोणती चाल खेळली जाणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.