close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फेसबुक, इन्स्टाग्रामवर अकाउंट नाही, 'त्या' पोस्ट माझ्या नाहीत - विश्वास नांगरे-पाटील

विश्वास नांगरे-पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे.  

Updated: Jun 25, 2019, 03:04 PM IST
 फेसबुक, इन्स्टाग्रामवर अकाउंट नाही, 'त्या' पोस्ट माझ्या नाहीत - विश्वास नांगरे-पाटील
संग्रहित छाया

नाशिक : डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे-पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. माझे फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अकाउंट नाही. माझ्या नावाने ज्या काही पोस्ट फिरत आहेत, त्याही माझ्या नाहीत, अशी माहिती खुद्द आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

मी पण सोशल मीडियाचा पीडित आहे. माझे फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर अकाऊंट नाही. माझ्या नावाने फिरणाऱ्या पोस्ट्स देखील माझ्या नाहीत, असे ते म्हणालेत. नांगरे-पाटील यांचा राज्यभरातल्या तरुणांवर चांगलाच प्रभाव आहे. मात्र फेसबुक, इन्स्टाग्रामवर माझे नसल्याने माझ्या नावाने असलेल्या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नाशिक शहरचे पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी केले आहे.

फेसबुकवरील तब्बल १९ पेज देखील बंद करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरची बनावट अकाउंट्स आणि त्यामुळे पसरणारी खोटी माहिती, फेक न्यूज हा सगळ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, विश्वास नांगरे-पाटील यांनी आपण सोशल मीडियाचा पीडीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर असल्याचे दिसत आहे.