डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: अंनिसकडून 'जवाब दो' आंदोलनाचं आयोजन

साने गुरुजी स्मारक येथे दाभोलकरांच़्या 'भ्रम और निरास' या पुस्तकाच लोकार्पण करण्यात येईल.

Updated: Aug 20, 2018, 08:37 AM IST
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: अंनिसकडून 'जवाब दो' आंदोलनाचं आयोजन title=

पुणे: डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (२०, ऑगस्ट)  ५ वर्षे पूर्ण होतायत. त्यांच्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 'जवाब दो' आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. या आंदोलनाची सुरवात सकाळी ७.१५ ला विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकऱ़ यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.

अंनिसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत..

विठ्ठल रामजी शिंदे पूल ते ते साने गुरुजी स्मारक दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात़ येणार आहे. या आंदोलनात समाजवादी नेते बाबा आढाव,  हमीद दाभोलकर,  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मेधा पानसरे यांच्यासह अंनिसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत.

'भ्रम और निरास' या पुस्तकाच लोकार्पण

दरम्यान,  साने गुरुजी स्मारक येथे दाभोलकरांच़्या 'भ्रम और निरास' या पुस्तकाच लोकार्पण करण्यात येईल.. या शिवाय दिवसभरात नाटक, चर्चा सत्र यांचंही आयोजन करण्यात आलं आहे.