डी एस कुलकर्णींच्या मालमत्ता, बँक खात्यांवर जप्तीची कारवाई

अधिसूचनेत असलेल्या मालमंत्ता आता राज्य सरकारच्या ताब्यात गेल्या आहेत.

Updated: May 12, 2018, 05:35 PM IST
डी एस कुलकर्णींच्या मालमत्ता, बँक खात्यांवर जप्तीची कारवाई title=

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसाईक डी एस कुलकर्णीच्या मालमत्तांच्या जप्तीची अधिसूचना निघाली आहेत. मालमत्ता, बँक खाती आणि वाहणे अधिसूचनेनूसार जप्त करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेत असलेल्या मालमंत्ता आता राज्य सरकारच्या ताब्यात गेल्या आहेत.

खरेदीदार नाही... 

दरम्यान, या अगोदर डीएस कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक नसलेले दिसले होते. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकही ग्राहक पुढे आला नव्हता. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी डीएसकेंच्या बालेवाडी इथली जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विक्रीला काढली. त्यासाठी बँकेने वृत्तपत्रातून जाहीरात देऊन इच्छुकांकडून निविदा मागवल्या होत्या. मात्र, खरेदीसाठी एकही निविदा आली नव्हती. बालेवाडी येथील मालमत्ता तारण ठेवून डीएसकेंनी सेंट्रल बँकेकडून कर्ज घेतले होते. सेंट्रल बँकेचे ७७ कोटी रुपये थकीत आहेत. तर या मालमत्तेची राखीव किंमत ६६ कोटी ३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.