मुंबई : Ramdas Kadam on Shiv Sainik : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. अरे व्वा, ज्यांनी शिवसेना मोठी केली, त्यांची हकालपट्टी करण्यात आली. अनिल परब राष्ट्रवादी नेते असल्यासारखे वागत आहेत. कडवट निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जात आहे. पण मी सांगू इच्छीतो माझी हकालपट्टी केली तरी मी कडवा शिवसैनिक आहे. मरेपर्यंत मी शिवसैनिक राहणार, असे बेधडक मत यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
दरम्यान, त्याचवेळी त्यांनी एक मोठा प्रश्न यावेळी उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत उद्धव ठाकरे की अनिल परब, असा आम्हाला प्रश्न पडला आहे. अनिल परब हे राष्ट्रवादीचे नेते असल्यासारखे वागत आहेत. कडवट निष्ठावान असून आम्हाला त्रास दिला जात आहे. अडीच वर्षांपूर्वी मी सांगितले होते, मी निवडणूक लढणार नाही. विधानपरिषद ही मागितलेली नाही. माझ्या विरोधात खोट्या बातम्या देण्यात आल्या आहेत. मी भाजपमध्ये जाणार, असे सांगितले गेले. पण मी सांगतो, मरेपर्यंत शिवसैनिक असणार आहे. मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे. मी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काही उमेदवार उभे केले आहेत. ते निवडून येणार आहेत. या ठिकाणी शिवसेनेची पुन्हा सत्ता येईल, असे ते म्हणाले.
रामदास कदम यांना शिवसेनेतून संपविण्याचा विडा उचला गेला आहे. पालकमंत्री अनिल परब यांच्याबद्दल रत्नागिरीत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज आमचे नेते उदय सामंत आहेत. त्यांनी आम्हाला शिवसेना काय आहे, हे सांगावे?. पक्षाची निष्ठा आता आम्हाला उदय सामंत यांच्याकडून शिकावी लागते, असा टोला त्यांनी मंत्री उदय सामंत यांना हाणला. आम्ही गेली 52 वर्षे शिवसेनेचे काम करत आहे. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा आहे. मी शिवसैनिक आहे आणि मरेपर्यंत राहणार, असे रामदास कदम यांनी सांगितले.
अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री. त्यांचे पालक म्हणून कुठलेही काम नाही. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात प्रचंड असंतोष आहे. माझ्या विरोधात मेळाव्यात ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांचा निषेध करतो. याच्यामागे कोण हे मला माहित आहे. शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात टाकणारा अनिल परब आहे. अनिल परब गद्दार आहे. एसटी कामगारांसाठी यांना वेळ नाही. माझ्या विरोधात काम करण्यासाठी ते रत्नागिरीत येत आहेत, असा घणाघात यांनी रामदास कदम केला आहे.